मुंबई येथील बाल विकास मंदिर मध्ये अमृत वर्ग मेळ्याचे आयोजन

सदर प्रशिक्षणासाठी अमृत संस्थेच्या वतीने श्री. कैलास कुरकुटे हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये बाल विकास विद्या मंदिर मधील जवळपास ४६ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना अमृत वर्गाच्या विविध टप्प्यांची माहिती व त्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

मुंबई येथील बाल विकास मंदिर मध्ये अमृत वर्ग मेळ्याचे आयोजन  मुख्य फोटो
मुंबई येथील बाल विकास मंदिर मध्ये अमृत वर्ग मेळ्याचे आयोजन  अतिरिक्त फोटो

मुंबईतील जोगेश्वरी मधील बाल विकास विद्या मंदिर येथे अमृत वर्ग प्रशिक्षणाचा शुभारंभ सदर प्रशिक्षणासाठी अमृत संस्थेच्या वतीने श्री. कैलास कुरकुटे हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये बाल विकास विद्या मंदिर मधील जवळपास ४६ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना अमृत वर्गाच्या विविध टप्प्यांची माहिती व त्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

अमृत वर्गामध्ये घेण्यात येणारे प्रमुख गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत : प्रार्थना शिथली करण बैठकीचे खेळ आज्ञा अभ्यास मैदानी खेळ कृतीयुक्त गीते राष्ट्रीय घोषणा

या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना महत्त्व समजावून दिले

अमृत वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रभक्ती, देशप्रेम, स्वयंशिस्त, नेतृत्वगुण व सामाजिक बांधिलकी यांसारखे गुण विकसित होण्यास मदत होते. या प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान विद्यार्थी आपल्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतील आणि भविष्यात ३० ते ४० अमृत वर्ग घेतील, असा विश्वास शाळेचे शारीरिक शिक्षणाचे श्री. चव्हाण सर यांनी व्यक्त केला.

सदर अमृत वर्ग प्रशिक्षणाच्या वेळी मुबई जिल्हा व्यवस्थापक राजेश पवार, उपस्थित होते.

बाल विकास विद्या मंदिर येथून अमृत वर्गाची सुरवात करण्यात आली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Rajesh Pawar News publisher name | Date: 02-10-2026 News publication date | Time: 10:32 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: Mumbai_City Related district of the news
Publisher: Rajesh Pawar News publisher name | Date: 02-10-2026 News publication date | Time: 10:32 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: Mumbai_City Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement