गोंदिया येथे सेवा संकल्प अभियान’द्वारे ग्रामीण भागात अमृत योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार

अमृतच्या माध्यमातून ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्ह्यातील २२ गावांमध्ये जनजागृती, मार्गदर्शन व लक्षित गटांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.

गोंदिया येथे सेवा संकल्प अभियान’द्वारे ग्रामीण भागात अमृत योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार मुख्य फोटो
गोंदिया येथे सेवा संकल्प अभियान’द्वारे ग्रामीण भागात अमृत योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार अतिरिक्त फोटो

‘सेवा संकल्प अभियान’द्वारे ग्रामीण भागात अमृत योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार गोंदिया : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT)च्या माध्यमातून ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार असून, या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत अमृतच्या विविध योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकूण २२ गावांमध्ये जनजागृती, मार्गदर्शन तसेच लक्षित गटांच्या बैठका आयोजित करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या अभियानाचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील विशेषतः EWS घटकातील पात्र नागरिकांपर्यंत AMRUTच्या विविध योजना, कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच उपलब्ध आर्थिक सहाय्याबाबत सविस्तर माहिती पोहोचविणे हा आहे. योजनांची माहिती केवळ कार्यालयीन स्तरावर मर्यादित न राहता ती प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी AMRUTची टीम गावपातळीवर जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहे. अनेकदा योजनांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन ‘लाभार्थी शोधा, योजना समजवा आणि लाभ मिळवून द्या’ या उद्देशाने अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. गावांमध्ये बैठका, प्रत्यक्ष संवाद व मार्गदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांच्या गरजा समजून घेऊन त्यांना संबंधित योजनांची माहिती देण्यात येणार आहे. AMRUT जिल्हा व्यवस्थापक कार्तिक तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यावेळी AMRUT मित्र प्रणय नागले यांनी लाभार्थी-केंद्रित कार्यपद्धतीवर भर देताना सांगितले की, लाभार्थ्यांसाठी अमृतचे कार्य केवळ कार्यालयीन वेळेपुरते मर्यादित न ठेवता समाजाच्या गरजेनुसार नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. पात्र EWS घटकातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत अमृतच्या योजनांची माहिती पोहोचविणे हा अभियानाचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अभियानामुळे ग्रामीण भागातील पात्र नागरिकांना विविध शासकीय संधी व अमृतच्या योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार असून, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील पात्र नागरिकांनी अमृतच्या योजनांची माहिती घेऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 03-10-2026 News publication date | Time: 01:18 PM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 03-10-2026 News publication date | Time: 01:18 PM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement