श्री साईधाम वृद्धाश्रम, खिडकाळी येथे भेट देऊन आश्रमातील महिला व आजींची तसेच त्यांच्या दिवाळी फराळाच्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. यावेळी विश्वस्त प्रिया कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना अमृत योजनांची माहिती दिली तसेच सेवा संकल्प अभियान अंतर्गत उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच अमृत पेठ ऑनलाइन आणि ऑफलाइन या बद्दल ही माहिती देण्यात आली.
खिडकाळी येथील श्री साईधाम वृद्धाश्रमाला भेट देऊन आश्रमातील महिला व आजींची तसेच त्यांच्या दिवाळी फराळाच्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. यावेळी विश्वस्त प्रिया कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना अमृत योजनांची माहिती दिली, तसेच सेवा संकल्प अभियान अंतर्गत उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच अमृत पेठ ऑनलाइन आणि ऑफलाइन याबद्दलही माहिती देण्यात आली.
आश्रमातील महिला व आजी दरवर्षी दिवाळीच्या फराळाची तयारी करण्यासाठी उत्साहाने सहभागी होतात. तसेच आश्रमातील विशेष मुलांकडून तुपाचे दिवे, आर्टिफिशियल फुलांचे लटकन आणि इतर आकर्षक सजावटीच्या वस्तू तयार केल्या जातात.
या दिवाळीत नागरिकांनी आश्रमातील महिला व आजींनी बनवलेला दिवाळी फराळ तसेच विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंची आवर्जून ऑर्डर देऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या छोट्याशा खरेदीमुळे या महिला, आजी आणि विशेष मुलांचा आनंद द्विगुणित होण्यास मदत होईल. त्यामुळे नागरिकांनी या दिवाळीत आवर्जून ऑर्डर द्यावी, असे आवाहन विश्वस्त प्रिया कुलकर्णी यांनी केले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment