अहिल्यानगर येथील श्रीगोंदा शहरात "अमृत सेवा संकल्प" अभियानांतर्गत वृक्षारोपण

अहिल्यानगर मधील श्रीगोंदा शहर येथे "अमृत सेवा संकल्प" अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

 अहिल्यानगर येथील श्रीगोंदा शहरात "अमृत सेवा संकल्प" अभियानांतर्गत वृक्षारोपण   मुख्य फोटो
 अहिल्यानगर येथील श्रीगोंदा शहरात "अमृत सेवा संकल्प" अभियानांतर्गत वृक्षारोपण   अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर :- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने "सेवा संकल्प अभियान" निमित्त "सेवा माझे योगदान" या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निरामय मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. उत्तम लक्ष्मण वडवकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्री. वैभव कुलकर्णी, श्री. आदित्य अनवणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

एक दिवस राष्ट्रासाठी… एक पाऊल समाजासाठी..!

या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उपस्थित नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अमृत संस्था ही "अमृत सेवा संकल्प" अभियानाच्या माध्यमातून जिल्हाभर विशेष सामाजिक, पर्यावरणीय आणि जनजागृतीपर उपक्रम राबविणार आहे, असे अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी सांगितले आहे. अमृत संस्थेविषयी :- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी, अगरवाल, हिंदू -वीरशैव लिंगायत व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून,अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/ जिल्हा कार्यालय पत्ता :-फ्लॅट नंबर-2, वरुण अपार्टमेंट,शिंगवी ज्वेलर्स शेजारी,आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003 अमृत कार्यालय संपर्क :-9112228769

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 03-10-2026 News publication date | Time: 11:31 AM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 03-10-2026 News publication date | Time: 11:31 AM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement