महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात अमृत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या नवीन बॅचचा शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
आर्वी, जि. वर्धा | दि. २९ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात अमृत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या नवीन बॅचचा शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना ब्युटी पार्लर क्षेत्रातील विविध आवश्यक कौशल्यांचे सैद्धांतिक तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. सौंदर्य निगा, त्वचा व केसांची निगा, मेकअप, विविध ब्युटी ट्रीटमेंट्स यांसह ग्राहकांशी संवाद, पार्लर व्यवस्थापन आणि व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचे मार्गदर्शन प्रशिक्षणादरम्यान करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना स्वतःचा ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी, रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी तसेच कौशल्याच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रसंगी अमृतचे वर्धा जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेशजी खराटे तसेच जिल्हा उपव्यवस्थापक धीरज राठी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाचा नियमित लाभ घेऊन आत्मविश्वासाने कौशल्य आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे हा अमृतच्या विविध उपक्रमांचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्याच अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात सुरू झालेला अमृत ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रम प्रशिक्षणार्थींच्या कौशल्यांना योग्य दिशा देत त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने पुढे नेणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment