'' शिरोळ तालुका आलास येथे मेहंदी कोर्स प्रशिक्षणाला सुरुवात. 30 सप्टेंबर पासून दहा दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रशिक्षणासाठी दिला आहे या प्रशिक्षणामध्ये ११ महिलांनी सहभाग नोंदवला आहे.
शिरोळ तालुका आलास येथे मेहंदी कोर्स प्रशिक्षणाला सुरुवात. 30 सप्टेंबर पासून दहा दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रशिक्षणासाठी दिला आहे या प्रशिक्षणामध्ये ११ महिलांनी सहभाग नोंदवला आहे या प्रशिक्षणासाठी तज्ञ प्रशिक्षिका म्हणून सौ अरूंधती चम्पन्नवर मॅडम या लाभल्या आहेत त्यांचा या क्षेत्रातील चार वर्षाचा अनुभव आहे. मेहंदी प्रशिक्षण (Mehndi Training) हा एक उत्तम आणि फायदेशीर करिअर पर्याय आहे. जर तुम्हाला कला आणि डिझाइनमध्ये रस असेल, तर व्यावसायिक मेहंदी आर्टिस्ट बनून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा फ्रीलान्स काम करू शकता व्यावसायिक दृष्टिकोनाने त्या महिलांना प्रशिक्षणे देणार आहेत. या माध्यमातून त्यांना येणाऱ्या काळामध्ये लग्न समारंभ किंवा अन्य कोणत्याहि ठिकाणी समारंभासाठी मेहंदी काढण्यासाठी जाता येईल व यातून त्यांना स्वतंत्र व्यावसायिक बनता येऊ शकेल या कार्यक्रमाचे उद्घाटन अमृत जिल्हा उपव्यवस्थापक अभिजीत कुलकर्णी यांनी केले यावेळी दिपाली केरिपाळे महिला बचत गट व सामाजिक कार्यकर्त्या या उपस्थित होत्या. या ठिकाणच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर अन्य ठिकाणच्या प्रशिक्षणाची देखील आपण व्यवस्था करू असे केरिपाळे दांपत्याने यावेळी आपल्या मनोगतातून आपले मत व्यक्त केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment