सोलापूर मध्ये ‘अमृत’तर्फे आयोजित मेहंदी प्रशिक्षणाचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर मध्ये ‘अमृत’तर्फे आयोजित मेहंदी प्रशिक्षणाचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर मध्ये ‘अमृत’तर्फे आयोजित मेहंदी प्रशिक्षणाचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य फोटो
सोलापूर मध्ये ‘अमृत’तर्फे आयोजित मेहंदी प्रशिक्षणाचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अतिरिक्त फोटो

सोलापूर

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या सोलापूर जिल्हा कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेहंदी प्रशिक्षण वर्गाचा तिसरा दिवस काल, दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षक मीनल ताई कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांना मेहंदीच्या विविध व आकर्षक डिझाईन्स अगदी सोप्या पद्धतीने कशा काढायच्या, याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकासह दिलेल्या या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थी महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

प्रशिक्षणादरम्यान सर्व सहभागी महिलांनी अत्यंत आस्थेने आणि कलात्मकतेने स्वतःच्या हातावर सुरेख मेहंदी रेखाटली. प्रात्यक्षिक पूर्ण झाल्यानंतर सर्व महिलांनी आपला आनंद व्यक्त केला. ‘अमृत’ संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे आम्हाला रोजगाराभिमुख आणि नाविन्यपूर्ण कला शिकण्याची मोफत संधी मिळत असून, याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास उपस्थित महिलांनी व्यक्त केला व संस्थेचे आभार मानले.

या प्रशिक्षण वर्गाला सोलापूर जिल्ह्यातील महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, ‘अमृत’च्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

१०८ A, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतीराज हॉटेलच्या पुढे, सात रस्ता, मोदीखाना, सोलापूर - ४१३००१.
संपर्क क्रमांक: ९११२२२८७६८

Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 01-10-2026 News publication date | Time: 06:32 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement