विठ्ठलवाडी : पांडुरंग विद्यामंदिर, विठ्ठलवाडी येथे विश्वबंधुत्व पंधरवडा निमित्त “व्यसनमुक्त महाराष्ट्र व राष्ट्रीय कर्तव्य” या विषयावर प्रेरणादायी युवा संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला.
विठ्ठलवाडी : पांडुरंग विद्यामंदिर, विठ्ठलवाडी येथे विश्वबंधुत्व पंधरवडा निमित्त “व्यसनमुक्त महाराष्ट्र व राष्ट्रीय कर्तव्य” या विषयावर प्रेरणादायी 'जेन Z युवा संवाद' कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विशाल दत्तात्रय कुंभार, ह.भ.प. श्री. पंढरीनाथ गायकवाड तसेच अमृत संस्थेचे श्री. कमलाकर कुलकर्णी व सावता सेना प्रदेशाध्यक्ष विशाल गायकवाड उपस्थित होते. यावेळी श्री. कमलाकर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची सविस्तर माहिती दिली.
मुख्य वक्त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन, राष्ट्रीय कर्तव्य, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि आनंदीबाई जोशी यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती देत शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा संदेश दिला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्याचा संदर्भ देत देशाच्या विकासामध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव ठेवावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवा या मूल्यांना आपल्या जीवनात प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळाली.
विश्वबंधुत्व पंधरवड्यानिमित्त झालेल्या या युवा संवाद कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रीय कर्तव्याबाबत सकारात्मक जाणीव निर्माण झाली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment