वर्धा शासनाच्या दालनात विद्यार्थ्यांचा संवाद; आष्टीत ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ उपक्रम

वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहरातील तहसील कार्यालयात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), वर्धा यांच्या वतीने ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ उपक्रम राबविण्यात आला. हुतात्मा राष्ट्रीय इंग्लिश मीडियम स्कूलच्या ८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत तहसील कार्यालयातील विविध विभागांचे प्रत्यक्ष कामकाज, शासकीय प्रक्रिया आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची माहिती जाणून घेतली.

वर्धा शासनाच्या दालनात विद्यार्थ्यांचा संवाद; आष्टीत ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ उपक्रम मुख्य फोटो
वर्धा शासनाच्या दालनात विद्यार्थ्यांचा संवाद; आष्टीत ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ उपक्रम अतिरिक्त फोटो

आष्टी, जि. वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहरातील तहसील कार्यालयात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), वर्धा यांच्या वतीने २९ सप्टेंबर २०२४ रोजी ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना शासनाची प्रशासकीय यंत्रणा, विविध विभागांचे कामकाज आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय सेवांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात हुतात्मा राष्ट्रीय इंग्लिश मीडियम स्कूल, आष्टी येथील ८६ विद्यार्थी सहभागी झाले. त्यांच्यासोबत शिक्षक श्री. उमेश मख, श्री. चौधरी तसेच शिक्षिका सौ. जया कोहळे उपस्थित होत्या.

यावेळी नायब तहसीलदार श्री. ओमप्रकाश बाळस्कर, श्री. विनोद वरकड – प्रस्तुतकार आणि श्री. कपिल गायकवाड – तलाठी यांनी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना निवडणूक विभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, जनगणना विभाग, सेतू विभाग तसेच आवक-जावक विभाग यांची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. तसेच विविध शासकीय सेवा, कार्यालयीन प्रक्रिया आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत विविध शासकीय प्रक्रिया आणि सेवांबाबत प्रश्न विचारले. त्यामुळे केवळ पुस्तकी माहिती न घेता शासकीय कार्यालयाचे प्रत्यक्ष कामकाज जवळून समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

हुतात्मा राष्ट्रीय इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. शारदा ढोले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शासकीय कार्यालयात भेट देऊन प्रशासनाचे कामकाज समजून घेता येणे ही उपयुक्त बाब असून, हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, उपयुक्त आणि अनुभवाधारित असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच शिक्षिका सौ. जया कोहळे यांनीही ‘अमृत विद्यार्थी शासन संवाद सेतू’ उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. विद्यार्थ्यांना विविध शासकीय विभागांचे कामकाज प्रत्यक्ष पाहता आले आणि शासनाच्या विविध सेवांबाबत माहिती मिळाल्याने हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरला, असे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमासाठी वर्धा जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक श्री. ऋषिकेश जी. खराटे तसेच वर्धा जिल्ह्याचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. धीरज राठी यांचे मार्गदर्शन लाभले. अमृत संस्थेविषयी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर शासकीय संस्था, आयोग किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविते.

अमृतच्या लक्ष्यित गटामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू आदी समाजांचा समावेश आहे. वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र व्यक्तींना अमृतच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. अधिक माहितीसाठी संपर्क अमृत, वर्धा जिल्हा कार्यालय प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हिल लाईन, वर्धा. मोबाईल : 9112227632

Publisher: Dhiraj Rathi News publisher name | Date: 01-10-2026 News publication date | Time: 04:11 PM News publication time | Views: 10 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news
Publisher: Dhiraj Rathi News publisher name | Date: 01-10-2026 News publication date | Time: 04:11 PM News publication time | Views: 10 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement