वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहरातील हुतात्मा राष्ट्रीय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), वर्धा यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
आष्टी, जि. वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहरातील हुतात्मा राष्ट्रीय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), वर्धा यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि वृक्षांचे संगोपन करण्याची सवय लागावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ. शारदा ढोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
अमृतचे जिल्हा व्यवस्थापक मा. ऋषिकेशजी खराटे यांच्या उपस्थितीत शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक धीरज राठी तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लावलेल्या वृक्षांची नियमित काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment