अमृत जिल्हा कार्यालय कोल्हापूर येथे घनकचरा व्यवस्थापन संदर्भात अमृत सक्षम कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये कचऱ्यापासून उद्योग निर्मिती याविषयी व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आले हे मार्गदर्शन कुशाग्र फाउंडेशन पुणे यांच्या वतीने देण्यात आले .
अमृत जिल्हा कार्यालय, कोल्हापूर येथे घनकचरा व्यवस्थापन संदर्भात 'अमृत सक्षम' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कचऱ्यापासून उद्योग निर्मिती याविषयी व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन कुशाग्र फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने देण्यात आले. प्रशिक्षण देण्यासाठी कुशाग्र फाउंडेशनच्या वतीने शिवांजय कदम उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी अमृतच्या लक्षित गटातील १५ लोक उपस्थित होते.
सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला व आपल्या शंका मार्गदर्शकांना विचारून व्यवसायाच्या संदर्भातील सर्व माहिती घेतली. येणाऱ्या काळात कोल्हापूरमध्ये कचऱ्यापासून नक्कीच व्यवसाय निर्मिती करू, असे आश्वासन प्रशिक्षणार्थींनी दिले. लवकरच याविषयीचा विशेष सखोल प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात यावा व नवीन उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहू, असे मत प्रशिक्षणार्थींच्या प्रतिक्रियांमधून व्यक्त करण्यात आले.
अशा प्रकारचे प्रशिक्षण नाविन्यपूर्ण पद्धतीने अमृत या संस्थेने आयोजित केल्यामुळे कोल्हापूर येथील नवउद्योजकांनी समाधान व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.
अमृत जिल्हा कार्यालय कोल्हापूर
संपर्क 9112228764
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment