छत्रपती संभाजीनगर येथे महिलांना उद्योजकतेसाठी मिळाली अमृतच्या योजनांची माहिती

BBNG CSN Women’s Wing ची बैठक मित्रनगर येथे उत्साहात पार पडली. यावेळी अमृतचे उपजिल्हा व्यवस्थापक योगेश रोडे, अमृत सखी मंजु कुलकर्णी व अमृत मित्र रामेश्वर साळुंके यांनी महिलांना अमृतच्या विविध योजना, मोफत प्रशिक्षण व कौशल्यविकासाच्या संधींची माहिती दिली. डॉ. सोनल कुलकर्णी यांनी व्यवसायविषयक मार्गदर्शन केले.

छत्रपती संभाजीनगर येथे महिलांना उद्योजकतेसाठी मिळाली  अमृतच्या योजनांची माहिती मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगर येथे महिलांना उद्योजकतेसाठी मिळाली  अमृतच्या योजनांची माहिती अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर: BBNG CSN Women’s Wing ची बैठक बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी मित्रनगर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'अमृत'च्या वतीने उपजिल्हा व्यवस्थापक योगेश रोडे, अमृत सखी मंजु कुलकर्णी व अमृत मित्र रामेश्वर साळुंके यांना आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी डॉ. सोनल कुलकर्णी यांचे व्यवसायविषयक मार्गदर्शन व प्रेझेंटेशन झाले. अमृतचे उपजिल्हा व्यवस्थापक योगेश रोडे आणि अमृत सखी मंजु कुलकर्णी यांनी महिलांना अमृतच्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांनी व्यवसायाची सुरुवात कशी करावी, व्यवसाय वाढीसाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत, तसेच कौशल्यविकास व प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी कसे व्हावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अमृतच्या माध्यमातून महिलांसाठी आयोजित करण्यात येणारे विविध मोफत कोर्सेस, प्रशिक्षणाच्या संधी तसेच महिला उद्योजिकांसाठी असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. बैठकीच्या निमित्ताने उपस्थित महिला उद्योजिकांना एकमेकींशी संवाद साधून नेटवर्किंग करण्याची संधीही मिळाली.

BBNG CSN Women’s Wing च्या समन्वयक विनिता तिवस्कर यांच्या पुढाकारातून आयोजित बैठकीत राजेश्री कुलकर्णी, दिपाली सतरके, अर्चना पोहोनरकर, प्रतिभा देशपांडे, डॉ. ज्ञानदा नाखरे, स्मिता जोशी, अमिता मोदी, श्रद्धा देशपांडे, गीता आचार्य, स्नेहा लंके, माधुरी दाणेकर, वर्षा पारगावकर आदी उपस्थित होत्या.

या बैठकीला महिला उद्योजिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “एकच ध्यास... समर्थ! समृद्ध!! संपन्न!!!” या संकल्पनेतून महिलांना व्यवसाय, कौशल्यविकास आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 01-10-2026 News publication date | Time: 11:16 AM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 01-10-2026 News publication date | Time: 11:16 AM News publication time | Views: 42 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement