जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद

यवतमाळ येथे ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे विद्यार्थ्यांसाठी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अमोलकचंद महाविद्यालयातील सुमारे ७५ ते ८० विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद मुख्य फोटो
जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद अतिरिक्त फोटो

यवतमाळ येथे दि. ३० सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे विद्यार्थ्यांसाठी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अमोलकचंद महाविद्यालयातील सुमारे ७५ ते ८० विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मा. श्री. आदित्य शेंडे, तहसीलदार तथा अधीक्षक, यांनी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय कामकाजाची पद्धत, विविध विभागांचे कार्य तसेच प्रशासनामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत मार्गदर्शन केले.

‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रशासनाची कार्यपद्धती समजावी तसेच प्रशासनाशी संबंधित त्यांच्या मनातील शंकांचे निरसन व्हावे हा आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांसोबत सुमारे दीड तास प्रश्नोत्तरांचे सत्र घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रशासन, शासकीय यंत्रणा व प्रशासकीय कामकाजाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांचे मा. श्री. आदित्य शेंडे यांनी सविस्तर व समाधानकारक निरसन केले.

कार्यक्रमास अमोलकचंद महाविद्यालयाचे श्री. प्रवीण जाधव तसेच नायब तहसीलदार श्री. पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. अमृतच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा तसेच अमृत जिल्हा टीम उपस्थित होती.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. प्रवीण जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने हा संवाद विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व उपयुक्त ठरला. अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक ९११२२२७६३३

जिल्हा कार्यालय पत्ता : राणी झाशी चौक, चापमनवाडी, आठवडी बाजार, ज्ञानेश्वर मंदिर रोड, यवतमाळ, ४४५००१ यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 30-09-2026 News publication date | Time: 05:07 PM News publication time | Views: 87 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 30-09-2026 News publication date | Time: 05:07 PM News publication time | Views: 87 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement