अहिल्यानगरमध्ये स्थानिक लघुउद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अमृत संस्थेतर्फे ‘अमृतपेठ-थेट बाजारपेठ’ या उपक्रमाचे आयोजन
अहिल्यानगरमध्ये पुन्हा भरणार 'अमृतपेठ - थेट बाजारपेठ'.
स्टॉल बुकिंग सुरू
३१ ऑक्टोबर आणि ०१ नोव्हेंबर रोजी आयोजन
लघुउद्योजकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
अहिल्यानगर : स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात 'अमृत' या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे 'अमृतपेठ - थेट बाजारपेठ' हा विशेष उपक्रम राबवला जातो. अहिल्यानगरमध्ये आतापर्यंत भरलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्या उपक्रमाचे आयोजन अहिल्यानगरमध्ये करण्यात आले असून, ३१ ऑक्टोबर आणि ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी ही 'अमृतपेठ - थेट बाजारपेठ' भरणार आहे. अमृत संस्था आणि श्री चिरंजीव प्रतिष्ठान-नगर यांचाही यात सहभाग असणार आहे. स्वदेशी आणि दर्जेदार उत्पादने हे अमृतपेठेचे वैशिष्ट्य असून, ग्राहक आणि उत्पादक अशा दोघांसाठीही हा उपक्रम फायद्याचा ठरतो.
लघु उद्योजकांना आपली उत्पादने सादर करण्यासाठी अमृतपेठ हे एक उत्तम व्यासपीठ असून, पुढील प्रकारची उत्पादने असलेल्या उद्योजकांनी आपला स्टॉल बुक करण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे.
- साड्यांचे प्रकार व कपडे
- हँडमेड वस्तू
- घरगुती पदार्थ (मसाले, पापड, फूड पॅकेट्स)
- कलात्मक वस्तू
- ज्वेलरी, बॅग्स
- पूजा साहित्य
- लहान मुलांच्या वस्तू
- स्वादिष्ट खाद्यपदार्थ
- विविध प्रकारचे आंबे (हापूस, पायरी, केशर इत्यादी)
- इन्शुरन्स आणि सोलर उत्पादने
- दिवाळीसाठी लागणारे सर्व साहित्य
या व्यतिरिक्त सर्व शासकीय योजनांची माहिती देणारा आणि नोंदणी करून घेणारा स्टॉलही अमृतपेठमध्ये असेल.
अमृतपेठ थेट बाजारपेठ
दिनांक : ३१ ऑक्टोबर आणि ०१ नोव्हेंबर २०२६
वेळ : सकाळी ९:३० ते रात्री ९:००
स्थळ : हॉटेल द व्हाईट हाऊस हॉल, ड्राय फ्रूट हाऊस मागे, कोहिनूर मॉल जवळ, नगर-मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर
अधिक माहिती आणि स्टॉल बुकिंगसाठी संपर्क क्रमांक:
गौरी कुलकर्णी : ९११२२२८७६९
विनय कुलकर्णी : ९९६०३६८४९४
जिल्हा कार्यालय पत्ता :- वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी, अगरवाल, हिंदू -वीरशैव लिंगायत व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून,अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 2 Comments
Misal Nilesh
Rate of stall
How much response from customer give
Misal Nilesh
Rate of stall
Write a Comment