डोंबिवली येथील ज्ञान मंदिर विद्या संकुल तसेच टिळक नगर विद्यामंदिर येथे आज अमृत संस्थेच्या वतीने अमृत वर्ग प्रशिक्षणाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
डोंबिवली | दि. २९ सप्टेंबर २०२६
डोंबिवली येथील ज्ञान मंदिर विद्या संकुल तसेच टिळक नगर विद्यामंदिर येथे आज अमृत संस्थेच्या वतीने अमृत वर्ग प्रशिक्षणाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या प्रशिक्षणासाठी अमृत संस्थेचे प्रशिक्षक श्री. कैलास कुरकुटे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये ज्ञान मंदिर विद्या संकुलाचे सुमारे ३५० तर टिळक नगर विद्यामंदिरचे ६० असे एकूण ४१० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना अमृत वर्गाची संकल्पना, विविध टप्पे आणि त्यांचे शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांकडून अमृत वर्गातील उपक्रमांचे प्रात्यक्षिकही करून घेण्यात आले.
अमृत वर्गातील प्रमुख उपक्रम
* प्रार्थना
* शीतलीकरण
* बैठकीचे खेळ
* आज्ञा अभ्यास
* मैदानी खेळ
* कृतीयुक्त गीते
* प्रेरणादायी गोष्टी
* राष्ट्रीय घोषणा
* कल्याण मंत्र
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. दीपक परदेशी सर तसेच शिक्षकवृंदाने अमृत संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अमृत वर्ग उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. तसेच टिळक नगर विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री. खेमाजी राऊत सर यांनी उत्तम सहकार्य केले.
यावेळी अमृत संस्थेच्या उपजिल्हा व्यवस्थापिका माया रत्नपारखी-खेत्रे आणि पारिजात कुलकर्णी उपस्थित होत्या.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment