अहिल्यानगर मधील पारनेर तालुका येथे १० दिवसीय "अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण" कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अहिल्यानगर मधील पारनेर या ठिकाणी "अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण" कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पारनेर येथील प्रतिष्ठित डॉ. किशोरकुमार पुरकर यांच्या हस्ते या १० दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे प्रतिमा पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पारनेर तालुका कुटुंब प्रमुख रमेश जगदाळे हेही उपस्थित होते.
विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज पहिला दिवस होता. उद्घाटनानंतर श्री. वैभव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
प्रशिक्षणामध्ये प्रथम दिवशी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सागर भोपे यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, अमृत पेठ थेट बाजारपेठ, इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म, व्याज परतावा योजना व इतर सर्व योजनांची माहिती दिली.
राज्यातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणे व रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. पारनेर सारख्या ग्रामीण भागात प्रथमच असे प्रशिक्षण होत आहे.
यावेळी डॉ. किशोरकुमार पुरकर, श्री. दिनेशजी बडवे, ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक श्री. विनोदजी गोळे, पारनेर तालुका ब्राह्मण समाज अध्यक्ष श्री. शशिकांत जोजार, उद्योजक श्री. रमेश जगदाळे, श्री. जयवंत जगदाळे, श्री. नरेंद्र पुरकर, श्री. वैभव भालेराव, श्री. संजय जामगावकर, श्री. संदीप पुंडलिक, श्री. संदीप धोंगडे, श्री. अक्षय जगदाळे हे उपस्थित होते.
प्रशिक्षणामध्ये एकूण १५ लाभार्थ्यांनी नोंदणी करून सहभाग घेतला आहे. बँक अधिकारी, मार्केटिंग अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. विनोदजी गोळे, श्री. वैभव भालेराव, श्री. संदीप पुंडलिक व श्री. ऋषिकेश बडवे यांचे विशेष सहकार्य लाभले.
समारोप वेळी डॉ. किशोरकुमार पुरकर यांनी अमृत संस्थेचे आभार मानत अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता :- अमृत,वरुण अपार्टमेंट,आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment