गडचांदुर (जि. चंद्रपूर) येथे अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात प्रारंभ

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. युवक-युवतींना बेकरी व्यवसायासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.

गडचांदुर (जि. चंद्रपूर) येथे अमृत  बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात प्रारंभ मुख्य फोटो
गडचांदुर (जि. चंद्रपूर) येथे अमृत  बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात प्रारंभ अतिरिक्त फोटो

प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना बेकरी व्यवसायाशी संबंधित विविध बाबींचे मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. बेकरी उत्पादनांची निर्मिती, आवश्यक साहित्याचा वापर, उत्पादनाची गुणवत्ता, स्वच्छता व सुरक्षितता तसेच व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक कौशल्यांबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले जात आहे.


कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवक-युवतींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम करणे आणि त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची भावना निर्माण करणे, या उद्देशाने अमृतच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रशिक्षणामुळे सहभागी प्रशिक्षणार्थींना बेकरी व्यवसायातील विविध संधींची माहिती मिळत असून, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होत आहे.


कार्यक्रमाला सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब मोहितकर व विठ्ठल थिपे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा व्यवस्थापक विक्रम मोहन पांडे, आदित्य सेंगर, अमृत मित्र सतीश नारायणदास आणि अमृत सखी वैष्णवी दारव्हेकर यांची उपस्थिती लाभली.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून देत प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. आत्मविश्वास, कौशल्य आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभारता येतो, असे मार्गदर्शन करण्यात आले.


अमृतच्या या उपक्रमाला प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कौशल्य विकासातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने हा प्रशिक्षण कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 30-09-2026 News publication date | Time: 12:14 AM News publication time | Views: 96 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 30-09-2026 News publication date | Time: 12:14 AM News publication time | Views: 96 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement