महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ गडचांदुर (जि. चंद्रपूर ) सभागृहाच्या पटांगणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांनी लावलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव तथा सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब मोहितकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य तथा निवृत्त शिक्षक विठ्ठलजी थिपे आणि अमृत मित्र सतीश नारायण दास यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
वाढते प्रदूषण, शहरीकरण आणि बदलत्या हवामानामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज अधिक अधोरेखित होत आहे. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांची नियमित देखभाल व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
परिसरात हिरवाई वाढवणे, वृक्षांचे योग्य संगोपन करणे तसेच पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
अमृतच्या वतीने आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकीचा सकारात्मक संदेश देण्यात आला. लावलेल्या वृक्षांची नियमित काळजी घेऊन त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment