देगलूर येथे महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या यांच्या माध्यमातून इ.डी.पी ग्लॅमर प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली. या प्रशिक्षणासाठी एकूण १५ विद्यार्थी सहभागी झाले असून, प्रशिक्षणाचा कालावधी १० दिवसांचा आहे.
देगलूर येथे इ.डी.पी. ग्लॅमर प्रशिक्षणाची उत्साहात सुरुवात देगलूर येथे महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या माध्यमातून इ.डी.पी. ग्लॅमर प्रशिक्षण कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात झाली. या प्रशिक्षणासाठी एकूण १५ विद्यार्थी सहभागी झाले असून, प्रशिक्षणाचा कालावधी १० दिवसांचा आहे. या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण सौ. भार्गवी दीक्षित करणार आहेत. प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना ब्युटी व ग्लॅमर क्षेत्रातील विविध कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या चार दिवसांच्या ऑफलाईन सत्रामध्ये बेसिक मेकअप, फाउंडेशन कसे करावे, मेकअपच्या मूलभूत तंत्रांचा वापर याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच पाच दिवस ऑनलाईन सेशन आयोजित करण्यात येणार असून, प्रशिक्षणाच्या एका दिवशी AMRUT संस्थेच्या ‘अमृतपेठ’ या उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना ब्युटी व ग्लॅमर क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, व्यावसायिक मार्गदर्शन व अमृतच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment