उद्योजकतेसाठी बाजारपेठेचा अभ्यास, योग्य नियोजन आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे मान्यवरांचे विचार
परभणी : महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमातील तिसरे सत्र अमृत जिल्हा कार्यालय, परभणी येथे उत्साहात संपन्न झाले. या सत्रात ‘मार्केट सर्वे, ग्रुप डिस्कशन व स्थानिक यशस्वी व्यावसायिकांचे मार्गदर्शन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी श्रीराम उद्योग समूहाचे उद्योजक श्री. चंद्रशेखर अळनुरे यांनी प्रशिक्षणार्थींना बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांच्या गरजा ओळखणे, उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ निश्चित करणे तसेच व्यवसायातील संधी व आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींनी विविध व्यावसायिक कल्पनांवर चर्चा केली. सत्रास प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment