देगलूर: 'अमृत ग्लॅमर बेसिक मेकअप प्रशिक्षणा'चा उद्यापासून श्रीगणेशा; जिल्हा उपव्यवस्थापकांचे मार्गदर्शन
देगलूर येथे उद्यापासून सुरू होत असलेल्या 'अमृत ग्लॅमर बेसिक मेकअप प्रशिक्षणा'निमित्त पूर्वतयारी बैठक संपन्न झाली
देगलूर: 'अमृत EDP' अंतर्गत देगलूर येथे सुरू होत असलेल्या "अमृत ग्लॅमर बेसिक मेकअप प्रशिक्षण" कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक 'त्रिवेणी पार्लर'च्या संचालिका तथा या बॅचच्या प्रमुख प्रशिक्षिका सौ. भार्गवीताई दीक्षित यांच्या उपस्थितीत सर्व प्रशिक्षणार्थींसोबत आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस 'अमृत' नांदेडचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना 'अमृत' योजनेचे स्वरूप, त्यांतर्गत राबवले जाणारे उपक्रम आणि या प्रशिक्षणाचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच उद्यापासून सुरू होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना दिली.
प्रशिक्षिका सौ. भार्गवीताई दीक्षित यांनी प्रशिक्षण वर्गाचे नियोजन आणि त्यात शिकवल्या जाणाऱ्या बेसिक मेकअपच्या विविध कौशल्यांबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी महिला व युवतींची मोठी उपस्थिती होती. या प्रशिक्षणामुळे परिसरातील महिलांना स्वयंरोजगाराची नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment