जालना येथे महिलांसाठी ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षणाचे आयोजन

प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना ज्वेलरी निर्मितीचे कौशल्य आत्मसात करून त्याचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी आवश्यक व्यावसायिक ज्ञान मिळणार आहे. कौशल्य, बाजारपेठेची समज आणि शासकीय योजनांची माहिती यांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशेने पुढे जाण्यास मदत होणार आहे.

जालना येथे महिलांसाठी ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षणाचे आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने अमृतच्या लक्षित गटातील महिलांसाठी ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना कौशल्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठी तसेच स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण व्हाव्यात, हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. सदर प्रशिक्षण ४ दिवस ऑफलाइन आणि ६ दिवस ऑनलाइन अशा स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. ऑफलाइन प्रशिक्षणामध्ये ज्वेलरी तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर ऑनलाइन सत्रांमध्ये व्यवसायाची निवड, व्यावसायिकाची मानसिकता, बाजारपेठेतील संधी व बाजारपेठेची निवड, भांडवल उभारणी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व ऑनलाइन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना ज्वेलरी निर्मितीचे कौशल्य आत्मसात करून त्याचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी आवश्यक व्यावसायिक ज्ञान मिळणार आहे. कौशल्य, बाजारपेठेची समज आणि शासकीय योजनांची माहिती यांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या दिशेने पुढे जाण्यास मदत होणार आहे. प्रशिक्षणासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख ३ ऑक्टोबर २०२६ आहे. सदर प्रशिक्षण अमृत संस्थेच्या लक्षित गटातील महिलांसाठी आयोजित करण्यात आले असून इच्छुक महिलांनी विहित मुदतीत नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना. मोबाईल : ७३९१०६५४७४

Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 28-09-2026 News publication date | Time: 04:44 PM News publication time | Views: 38 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news
Publisher: Nitin Khekale News publisher name | Date: 28-09-2026 News publication date | Time: 04:44 PM News publication time | Views: 38 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement