महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या माध्यमातून १० दिवसीय शिलाई प्रशिक्षणाला आज सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षणाचं उद्घाटन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृत सखी रुचा शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकूण १५ महिलांनी प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदवला.
छत्रपती संभाजीनगर : महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या माध्यमातून १० दिवसीय शिलाई प्रशिक्षणाला आज सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षणाचं उद्घाटन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृत सखी रुचा शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकूण १५ महिलांनी प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदवला.
हे प्रशिक्षण शेषगंगा इंटरप्रायझेस, आलोक नगर यांच्या माध्यमातून अंजली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येत आहे.
या प्रशिक्षणात महिलांना शिलाई मशीनची ओळख, मशीन चालवणे, धागा व बॉबिन भरणे, सरळ शिलाईचा सराव, कपड्यांचे माप घेणे, कटिंग आणि मार्किंग याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच बेबी किट, परकर, स्कर्ट, फ्रॉक, ब्लाऊज आणि कुर्ती शिवण्याचे कौशल्यही शिकवले जाणार आहे. यासोबतच मार्केटिंग, बिलिंग आणि तयार केलेल्या वस्तूंची विक्री कशी करावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे, या प्रशिक्षणादरम्यान महिलांना अमृतच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी त्यांना अमृत पेठ – थेट बाजारपेठ आणि अमृत ई-प्लॅटफॉर्मशी जोडण्यात येणार आहे. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment