विश्वबंधुत्व ही भारताची ओळख : मा.जयंत रानडे

सांगली येथील कैलासवासी ग. रा. पुरोहित कन्या प्रशालेत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ‘अमृत’ या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने विश्वबंधुत्व पंधरवड्यानिमित्त शालेय विद्यार्थिनींसाठी प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले.

विश्वबंधुत्व ही भारताची ओळख : मा.जयंत रानडे मुख्य फोटो
विश्वबंधुत्व ही भारताची ओळख : मा.जयंत रानडे अतिरिक्त फोटो

सांगली : येथील कैलासवासी ग. रा. पुरोहित कन्या प्रशालेत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी ‘अमृत’ या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने विश्वबंधुत्व पंधरवड्यानिमित्त शालेय विद्यार्थिनींसाठी प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगली जिल्हा उपव्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांनी केले. यात अमृतच्या विविध योजना व उपक्रमाची माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री जयंत रानडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाचा संदर्भ देत विश्वबंधुत्वाची संकल्पना स्पष्ट केली. भारतीयांनी प्राचीन काळापासून विश्वबंधुता हे मूल्य जपले आहे. भारताबाहेरून या देशात आलेल्या सर्वांना भारतीयांनी आपले मानले असून, त्यांना बंधुभावाने आदर व प्रेम दिले आहे. सर्व मानव हे एकाच परमेश्वराची लेकरे असून आपण सर्वजण विश्वकुटुंबातील बंधू-भगिनी आहोत, ही भावना भारतीयांची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन जयंत रानडे यांनी केले. कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. उमा संभूस, ‘अमृत’ कार्यालयाच्या सौ. गौरी कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत शिक्षक रघुवीर रामदासी यांनी केले. यावेळी विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारून वक्त्यांशी संवाद साधत प्रबोधन सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात 212 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. *अमृत संस्थेविषयी :-* अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही अश्या जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, हिंदू नेपाळी, भूमिहार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी, हिंदू वीरशैव लिंगायत इ. जातींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी. https://mahaamrut.org.in/ *अधिक माहिती साठी संपर्क : ९११२२२८७६६ /७०५७६०७४१९ /७९७२८३०७५७ महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर, राजवाडा, सांगली ४१६४१६

Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 28-09-2026 News publication date | Time: 03:22 PM News publication time | Views: 13 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news
Publisher: Shailendra Jahagirdar News publisher name | Date: 28-09-2026 News publication date | Time: 03:22 PM News publication time | Views: 13 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement