अमृत आणि यशस्वीनी उद्योजिका समूह यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे ‘सेवा संकल्प अभियान’

नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नयेत आणि आवश्यक दाखले सहज मिळावेत, यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि यशस्वी उद्योजिका समूह यांच्या वतीने पुंडलिकनगर येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विशेष शिबिर घेण्यात आले.

अमृत  आणि यशस्वीनी उद्योजिका समूह यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे ‘सेवा संकल्प अभियान’ मुख्य फोटो
अमृत  आणि यशस्वीनी उद्योजिका समूह यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नयेत आणि आवश्यक दाखले सहज मिळावेत, यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि यशस्वी उद्योजिका समूह यांच्या वतीने पुंडलिकनगर येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिराला परिसरातील महिला आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला.

शनिवार, २६ सप्टेंबर रोजी गायत्री दसरे, पुंडलिकनगर, गल्ली क्रमांक ७, गारखेडा परिसर येथे झालेल्या या उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाचा दाखला, नॅशनॅलिटी-डोमेसाईल दाखला तसेच इतर आवश्यक शासकीय कागदपत्रे काढून देण्यासाठी मदत करण्यात आली. दाखले काढताना लागणारी कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीही नागरिकांना समजावून सांगण्यात आली.

या कार्यक्रमाला अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे तसेच यशस्विनी उद्योजिका समूहाच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अमृत सखी मंजू कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांना अमृतच्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यामुळे शासकीय दाखल्यांसोबतच महिलांना रोजगार, व्यवसाय आणि प्रशिक्षणाच्या संधींचीही माहिती मिळाली.

शासकीय कागदपत्रे काढून देण्यासाठी गणेश दसरे, साई मल्टी सर्विसेस यांनी विशेष सहकार्य केले. तसेच अमृत मित्र रामेश्वर साळुंखे आणि यशस्विनी उद्योजिका समूहाच्या गायत्री दसरे, मनिषा खडके, मनिषा कुलकर्णी, भारती चोबे, रोहिणी भाले, राधिका ठोसर, वर्षा जोशी, मृणालिनी गोस्वामी आणि विनया कुलकर्णी उपस्थित होते. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 28-09-2026 News publication date | Time: 01:07 PM News publication time | Views: 33 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 28-09-2026 News publication date | Time: 01:07 PM News publication time | Views: 33 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement