‘सेवा संकल्प अभियान – एक दिवस राष्ट्रासाठी’ या उपक्रमातून जय विश्व भारती कॉलनी, रोपळेकर चौक येथील भारत माता मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि यशस्विनी उद्योजिका समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : ‘सेवा संकल्प अभियान – एक दिवस राष्ट्रासाठी’ या उपक्रमातून जय विश्व भारती कॉलनी, रोपळेकर चौक येथील भारत माता मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि यशस्विनी उद्योजिका समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला. या वेळी सर्वांनी हातात झाडू घेऊन मंदिर परिसरातील कचरा, पालापाचोळा इतर घाण साफ केली. सगळ्यांनी मिळून मंदिराचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका केला. ‘स्वच्छ मंदिर, स्वच्छ परिसर’ असा संदेश देत न या कामात सहभाग घेतला. या उपक्रमाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे भारत माता मंदिरात देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शंभरपेक्षा जास्त वीरांची चलचित्रातून माहिती देण्यात आलेली आहे. स्वच्छतेचे काम झाल्यानंतर उपस्थितांनी हे चलचित्र पाहून त्या वीरांच्या त्यागाची आणि देशासाठी केलेल्या बलिदानाची माहिती घेतली. ‘सेवा संकल्प – एक दिवस राष्ट्रासाठी’ या उपक्रमातून समाजासाठी आपल्या परीने काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंदिर परिसर स्वच्छ करण्याबरोबरच देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांची माहिती या वेळी देण्यात आली. या स्वच्छता अभियानाला माजी उपमहापौर संजय जोशी, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, यशस्विनी उद्योजिका समूहाच्या अध्यक्ष विजया कुलकर्णी, अमृत सखी मंजू कुलकर्णी, मनीषा खडके, सारिका पाठक आणि गायत्री दसरे यांची उपस्थिती होती. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment