भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त मंगळवार दि.29 सप्टेंबर 2026 रोजी “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र” अंतर्गत अहिल्यानगर मध्ये रोजगार मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले आहे.अमृत संस्थे च्या लक्षित गटातील युवकांना लाभ मिळण्यासाठी अहिल्यानगर अमृत टिम प्रयत्न करणार.
अहिल्यानगर मध्ये मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र” अंतर्गत रोजगार मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रभर 500पेक्षा जास्त ठिकाणी “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र” अंतर्गत रोजगार मेळावे/प्लेसमेंट ड्राईव्ह हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
अमृत संस्थे चे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त मा योगेश उगले यांची भेट घेतली. यावेळी कौशल्य विकास मंत्री मा.मंगलप्रभात लोढा यांचे स्वीय सहाय्यक मा.योगेश जोशी हेही उपस्थित होते. अमृत संस्थेच्या लक्षित गटातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगारच्या संधी उपलब्ध होईल हा मुख्य हेतू आहे. हा उपक्रम राज्यातील जिल्हा,तालूका व औद्योगिक परिसरांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अहिल्यानगर जिल्हयामध्ये 25 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहे. सदर रोजगार मेळाव्यासाठी अहिल्यानगर जिल्हयातील नामांकित कंपन्यांचे अधिकारी/प्रतिनिधी सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड करणार आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुकानिहाय रिक्तपदे च्या सविस्तर माहितीकरिता https://forms.gle/2QZFCTjqp6LseTma6
या लिंकवर जावे. अहिल्यानगर जिल्हयातील सर्व इच्छूक उमेदवारांनी रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी केले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत,व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता :- अमृत,वरुण अपार्टमेंट,आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी,अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment