यवतमाळ येथे महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) जिल्हा कार्यालय, यवतमाळ येथे थोरले बाजीराव पेशवे यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली.
यवतमाळ येथे महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) जिल्हा कार्यालय, यवतमाळ येथे थोरले बाजीराव पेशवे यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. यावेळी यवतमाळ विभागाचे सहकार्य वाढ श्री. संतोषजी मुत्तलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित अमृत अधिकारी-कर्मचारी व निमंत्रित पाहुण्यांना थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्याची, पराक्रमाची, नेतृत्वगुणांची व ऐतिहासिक योगदानाची माहिती दिली. थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, धाडस, कुशल नेतृत्व आणि युद्धनीतीतून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे मार्गदर्शन श्री. मुत्तलवार यांनी केले. यावेळी अमृत जिल्हा कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच उपस्थित मान्यवरांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment