यवतमाळ येथे अमृतच्या AI आधारित EDP प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन

यवतमाळ येथे दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ,अमृतच्या वतीने यवतमाळ येथे AI (Artificial Intelligence) आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) बॅचचे उद्घाटन दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले.

यवतमाळ येथे अमृतच्या AI आधारित EDP प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन मुख्य फोटो
यवतमाळ येथे अमृतच्या AI आधारित EDP प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन अतिरिक्त फोटो

यवतमाळ येथे दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ,अमृतच्या वतीने यवतमाळ येथे AI (Artificial Intelligence) आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) बॅचचे उद्घाटन दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले. यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. परीक्षित शर्मा तसेच जिल्हा कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा व्यावसायिक व उद्योजकीय क्षेत्रात प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. व्यवसाय नियोजन, डिजिटल माध्यमांचा वापर, व्यवसायवृद्धीसाठी AI साधनांचा उपयोग तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योजकीय क्षमता विकसित करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण सत्यम कॉम्प्युटरचे संचालक श्री. पवन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना AI तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देऊन त्याचा रोजगार, स्वयंरोजगार व व्यवसायवृद्धीसाठी उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अमृतच्या माध्यमातून लक्षित घटकातील युवक-युवतींमध्ये कौशल्यविकास व उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत असून, AI आधारित EDP प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आपल्या व्यवसायाच्या संधी विकसित करण्यास मदत होणार आहे.

Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 26-09-2026 News publication date | Time: 06:41 PM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 26-09-2026 News publication date | Time: 06:41 PM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement