शिरूर (जि. पुणे) येथे अमृत सेतू संवाद’ कार्यक्रमासाठी शिरूर प्रशासनाचे सहकार्य

शिरूर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अमृत सेतू संवाद’ या उपक्रमाच्या अनुषंगाने शिरूर तहसीलदार माननीय श्री. बाळासाहेब म्हस्के सर, गटशिक्षणाधिकारी श्री. प्रीतम कोकणे सर तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. महेश डोके साहेब यांची भेट घेण्यात आली.

शिरूर (जि. पुणे) येथे अमृत सेतू संवाद’ कार्यक्रमासाठी शिरूर प्रशासनाचे सहकार्य मुख्य फोटो
शिरूर (जि. पुणे) येथे अमृत सेतू संवाद’ कार्यक्रमासाठी शिरूर प्रशासनाचे सहकार्य अतिरिक्त फोटो

शिरूर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अमृत सेतू संवाद’ या उपक्रमाच्या अनुषंगाने शिरूर तहसीलदार माननीय श्री. बाळासाहेब म्हस्के सर, गटशिक्षणाधिकारी श्री. प्रीतम कोकणे सर तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. महेश डोके साहेब यांची भेट घेण्यात आली.

या भेटीदरम्यान ‘अमृत सेतू संवाद’ कार्यक्रमाचा उद्देश, विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे महत्त्व तसेच कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच कार्यक्रमाची तारीख व वेळ याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

यावेळी तहसीलदार श्री. बाळासाहेब म्हस्के, गटशिक्षणाधिकारी श्री. प्रीतम कोकणे आणि गटविकास अधिकारी श्री. महेश डोके यांनी ‘अमृत सेतू संवाद’ या उपक्रमासाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

विद्यार्थ्यांपर्यंत विविध शासकीय योजना, मार्गदर्शन व उपयुक्त माहिती पोहोचविण्यासाठी ‘अमृत सेतू संवाद’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रशासनाच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होणार आहे.

Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 26-09-2026 News publication date | Time: 04:41 PM News publication time | Views: 24 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement