विश्वबंधुत्व दिनानिमित्त गणेगाव खालसा येथील श्री रसिकलाल माणिकचंद धाडीवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, सामाजिक एकोपा, मानवता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आला.
गणेगाव खालसा : विश्वबंधुत्व पंधरवडा दिनानिमित्त गणेगाव खालसा येथील उद्योगपती श्री रसिकलाल माणिकचंद धाडीवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, सामाजिक एकोपा, मानवता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने व वक्ते श्री. पंढरीनाथ गायकवाड (आध्यात्मिक आघाडी पुणे जिल्हा सामाजिक कार्यकर्ते) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विश्वबंधुत्वाचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी आणि समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी युवकांची भूमिका याबाबत विचार मांडले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रामदास भोर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या अमृत संस्थेचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अमृत संस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव, बंधुभाव आणि मानवतेचा सकारात्मक संदेश मिळाला.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment