जगाच्या इतिहासातील अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे तथा राऊ यांची आज तिथीनुसार ३२६ वी जयंती, त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन
जगाच्या इतिहासातील अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे तथा राऊ यांची आज तिथीनुसार ३२६ वी जयंती ( विक्रमनाम संवत्सर , भाद्रपद शुद्ध पौर्णिमा , रविवार , शके-१६२२ ) त्यानिमित्त श्री देवदेवेश्वर संस्थान,पुणे यांच्या वतीने आज पर्वतीवरील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मा.विजय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थानचे मुख्य विश्वस्त सुधीर पंडित , विश्वस्त रमेश भागवत , विश्वस्त पुष्करसिंह पेशवा , विश्वस्त जगन्नाथ लडकत , व्यवस्थापक शेखर पत्की , डॉ.दिनेश पांडे , शशिकांत धर्माधिकारी उपस्थित होते. त्यानिमित्त श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment