अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयात महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अमृत संवाद सेतू उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना महसूल प्रशासनाचे प्रत्यक्ष कामकाज पाहण्याची तसेच अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयात महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अमृत संवाद सेतू उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना महसूल प्रशासनाचे प्रत्यक्ष कामकाज पाहण्याची तसेच अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी महेश रामगुंडे यांनी विद्यार्थ्यांना राशन कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, जमीन अभिलेख तसेच महसूल विभागाशी संबंधित विविध सेवांबाबत मार्गदर्शन केले. तसेच MPSC व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत उपलब्ध संधींबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. नायब तहसीलदार विकास राणे यांनी महसूल विभागाचे कार्य, विविध शासकीय योजना, आवश्यक कागदपत्रे व शासकीय सेवांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अमृतचे जिल्हा उप-व्यवस्थापक गणेश मुळे यांनी अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. तसेच अमृत संवाद सेतूचा उद्देशा बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्याशी संवाद साधून विविध प्रश्न विचारले. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. प्रत्यक्ष कामकाज पाहण्याची संधी आणि मिळालेले मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ. गोपालराव खेडकर महाविद्यालय, गाडेगाव (तेल्हारा) चे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांच्यासह डॉ. कृष्णा मोरे, डॉ. धीरजकुमार नजान, डॉ. गोपाल जोंधळेकर, डॉ. रजनी बोबडे, डॉ. गजानन इंगळे, डॉ. विजयकुमार खुमकर, प्रा. विरुळकर, प्रा. म्हात्रे, प्रा. उमेश इंगळे, मंगेश देवताळे, सचिन ढोले व राधा निचळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयातील ५८ विद्यार्थी उपस्थित होते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment