सोलापूर मध्ये ' अमृत'च्या योजनांमुळे सोलापुरातील लिंगायत समाजात नवचैतन्य; मा.विजय जोशी यांची जुळे सोलापुरात बैठक
सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत - AMRUT) चे व्यवस्थापकीय संचालक मा. विजय जोशी साहेब यांच्या जुळे सोलापूर येथील एका घरगुती बैठकीनंतर स्थानिक लिंगायत समाजात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बैठकी दरम्यान शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आश्वासन उपस्थित नागरिकांनी जोशी साहेबांना दिले. जुळे सोलापूर परिसरातील एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने ही अनौपचारिक बैठक पार पडली. यावेळी श्री. विजय जोशी यांनी लिंगायत समाजातील तरुण, उद्योजक, विद्यार्थी आणि महिलांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी 'अमृत' संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. शिक्षण, कौशल्य विकास, उच्च शिक्षण शिष्यवृत्ती आणि स्वयंरोजगारासाठी मिळणारे अर्थसहाय्य यांवर त्यांनी विशेष भर दिला. मा. विजय जोशी यांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित समाजबांधवांमध्ये सकारात्मक ऊर्जा दिसून आली. शासकीय योजनांचा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रसार करून प्रत्येक पात्र घटकाला याचा लाभ मिळवून देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. या बैठकीमुळे सोलापुरातील लिंगायत समाजात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, 'अमृत'च्या योजनांमुळे समाजातील तरुण पिढीला शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठी मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment