अनुराधा पुराणिक, बहुभाषिक ब्राह्मण संघटना महिला प्रमुख, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत मंदिर अर्चक पुरोहित आयाम महिला प्रांत सहसचिव व ओंजळ ग्रुपच्या संस्थापिका यांच्या हस्ते गणपती आरती करण्यात आली.आरतीनंतर कार्यालयात सर्व महिला पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात सुरू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त बुधवार, २३ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाची आरती उत्साहात पार पडली.
यावेळी अनुराधा पुराणिक, बहुभाषिक ब्राह्मण संघटना महिला प्रमुख, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत मंदिर अर्चक पुरोहित आयाम महिला प्रांत सहसचिव व ओंजळ ग्रुपच्या संस्थापिका तसेच अर्चना कुलकर्णी, कल्पना कुलकर्णी, वर्षा कुलकर्णी, आरती देशमुख, स्वाती जोशी, योगेश देशमुख, स्नेहल पांडव आणि त्यांच्या टीमच्या उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.
यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृत सखी रुचा शर्मा यांनी अनुराधाताई पुराणिक तसेच ओंजळ ग्रुपच्या महिला पदाधिकाऱ्यांचे अमृत कार्यालयाच्या वतीने स्वागत केले.
आरतीनंतर कार्यालयात सर्व महिला पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत अमृत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच अमृतच्या माध्यमातून महिला, युवक आणि लक्षित गटातील नागरिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबतही माहिती देण्यात आली. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment