सोलापूरमध्ये अमृतच्या उपक्रमांना ‘सकाळ’चे संपादक सिद्धराम पाटील यांचा उत्स्फूर्त पाठिंबा; व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांची भेट
सोलापूर, दि. १९ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)चे माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी सोलापूर दौऱ्यावर आले असता ‘सकाळ’ वृत्तपत्राचे संपादक श्री. सिद्धराम पाटील सर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. सिद्धराम पाटील यांनी अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती श्री. विजय जोशी यांच्याकडून जाणून घेतली. अमृतच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीदरम्यान ‘एक दिवस राष्ट्रासाठी’ या अमृतच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबतही सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रहित आणि समाजाच्या विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करत श्री. सिद्धराम पाटील यांनी या उपक्रमाला आपला कायमस्वरूपी पाठिंबा आणि सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. “‘एक दिवस राष्ट्रासाठी’ या उपक्रमामध्ये मी तुम्हाला कायम सपोर्ट करेन. अमृतसोबत मी नेहमीच काम करेन. अमृतच्या कार्याच्या पाठीशी मी सदैव उभा आहे. अमृतच्या उपक्रमांशी संबंधित कोणतीही बातमी असो किंवा कोणताही उपक्रम असो, माझा नेहमीच पाठिंबा राहील,” अशी भावना श्री. सिद्धराम पाटील यांनी व्यक्त केली. ‘सकाळ’चे संपादक सिद्धराम पाटील यांचा हा सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्याची भावना अमृतच्या कार्याला निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे. व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना समाजातील विविध क्षेत्रांतून मिळणारा हा प्रतिसाद संस्थेच्या कार्याला अधिक बळ देणारा ठरत आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment