सोलापूर जिल्ह्यात ‘अमृत पेठ’चा डंका वाजणार! माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी सर यांच्या उपस्थितीत BBNA टीमसोबत महत्त्वपूर्ण चर्चा !
सोलापूर:
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी सर सोलापूर दौऱ्यावर आले असता, BBNA चे श्री. तमनवार सर, श्री. कामतकर सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील उद्योजकता विकास आणि स्थानिक उत्पादनांच्या विपणनाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
या बैठकीत मुख्यत्वे ‘अमृत पेठ’ आणि ‘अमृत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म’ या उपक्रमांवर सविस्तर व सकारात्मक संवाद झाला. BBNA च्या टीमने माननीय व्यवस्थापकीय संचालकांना विश्वास दिला की, सोलापुरात ‘अमृत पेठ’चे भव्य व अतिशय नियोजनबद्ध आयोजन केले जाईल.
तालुक्या-तालुक्यात पोहचणार ‘अमृत पेठ’
सोलापूर शहरासोबतच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘अमृत पेठ’चा विस्तार कसा करता येईल, यावर बैठकीत विशेष मंथन झाले. स्थानिक उत्पादक, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि अमृत ई-कॉमर्सच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी BBNA टीमने पुढाकार घेतला आहे.
माननीय विजय जोशी सर यांच्यासोबत झालेली ही चर्चा अत्यंत फलदायी ठरली असून, यामुळे सोलापूर जिल्ह्यात ‘अमृत पेठ’चा डंका वाजणार आणि स्थानिक उद्योजकतेला नवी दिशा मिळणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment