सोलापुरात राजस्थानी ब्राह्मण मारवाडी समाजाची विशेष बैठक; 'अमृत'चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न !
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या उपक्रमांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी 'अमृत'चे माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी सर यांच्या विशेष उपस्थितीत सोलापूर येथील चाटी गल्ली गायत्री भवन येथे राजस्थानी ब्राह्मण मारवाडी समाजाच्या बांधवांची भव्य बैठक व कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या बैठकीला सोलापूर शहरातील राजस्थानी ब्राह्मण मारवाडी समाजातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी सर यांनी 'अमृत' संस्थेचे ध्येय-धोरण, विविध कल्याणकारी योजना आणि व्यवसायाला चालना देणाऱ्या उपक्रमांची सविस्तर व सोप्या भाषेत माहिती उपस्थितांना दिली. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे राजस्थानी ब्राह्मण मारवाडी समाजातील उपस्थितांना अमृत संस्थेचे कार्य आणि त्याचे महत्त्व स्पष्टपणे समजून घेता आले.
विजय जोशी सरांच्या या मार्गदर्शनपर भाषणानंतर उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अमृत संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून, समाजाच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांची अत्यंत गरज असल्याचे मत राजस्थानी ब्राह्मण मारवाडी समाजातील बांधवांनी व्यक्त केले. तसेच, "आम्ही सर्वजण अमृत संस्थेच्या ध्येय-धोरणांच्या व उपक्रमांच्या नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे राहू," असा निर्धार उपस्थितांनी या वेळी व्यक्त केला.
माननीय व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment