दिग्रसमध्ये 'अमृत'तर्फे सुरू झाला ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम

कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन महिला होणार आर्थिकदृष्ट्या सक्षम

दिग्रसमध्ये 'अमृत'तर्फे सुरू झाला ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य फोटो
मुख्य फोटो

दिग्रस (जि. यवतमाळ) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) माध्यमातून दिग्रसमध्ये ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. ३० डिसेंबर २०२५ रोजी या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण प्रदान करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे.

जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, डॉ. संजय बंग, सचिन बनगिनवार, अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, 'एमसीईडी'चे प्रकल्प अधिकारी रूपेश शिरूरकर, अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा, जिल्हा उपव्यवस्थापक कामेश राखे उपस्थित होते. यासाठी प्रशिक्षिका म्हणून सौ. वर्षा निघोट यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

अमृत संस्थेच्या माध्यमातून 'एमसीईडी'तर्फे राबवण्यात येणारे कौशल्यविकासाचे प्रशिक्षण कार्यक्रम लाभार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी व त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी कौशल्यविकास, संशोधन व प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे कार्य सातत्याने करण्यात येत आहे.
.....
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 30-12-2025 News publication date | Time: 01:11 PM News publication time | Views: 304 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 30-12-2025 News publication date | Time: 01:11 PM News publication time | Views: 304 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words