संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनीच्या व्यवस्थापकांचे प्रतिपादन
अमरावती : “योग्य संधी, मार्गदर्शन आणि थोडेसे आर्थिक पाठबळ मिळाले, तर केवळ शहरी नव्हे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी यशस्वी कारकीर्द घडवू शकतात. अमृतसारख्या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळणे ही सकारात्मक बाब आहे,” असे प्रतिपादन संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनीचे व्यवस्थापक प्रवीण चौधरी यांनी व्यक्त केली.
महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनीला नुकतीच अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांनी भेट देऊन कार्यपद्धतीची माहिती घेतली. या वेळी त्यांनी प्रबोधिनीतील ग्रंथालय व अभ्यासिकेला भेट देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमृत संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गोगरकर यांनी दिली. अमृत संस्थेची नवी दिनदर्शिकादेखील या वेळी देण्यात आली.
पत्ता : अमृत विभागीय कार्यालय,
आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडीसमोर,
टोपेनगर, अमरावती
केदार गोगरकर - 9112227635
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment