उमरखेडमधील महिलांना डिजिटल मार्केटिंग शिकून करायचीय उद्योग-व्यवसायाची प्रगती

अमृत संस्थेतर्फे आयोजित बैठकीत महिलांनी केली ठोस मागणी

उमरखेडमधील महिलांना डिजिटल मार्केटिंग शिकून करायचीय उद्योग-व्यवसायाची प्रगती मुख्य फोटो
मुख्य फोटो

उमरखेड (जि. यवतमाळ) : अमृत स्वयंरोजगार या विषयावर महिलांची महत्त्वाची बैठक उमरखेड येथील आर्य वैश्य भवनात २८ डिसेंबरला आयोजित करण्यात आली होती. स्वयंरोजगाराच्या विविध संधींसोबतच डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जावे, अशी मागणी या बैठकीत स्थानिक महिलांनी केली. अमृत अर्थात महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सक्षमीकरण, कौशल्यविकास आणि आधुनिक रोजगारसंधींबाबत मार्गदर्शन करण्याचे कार्य केले जाते.

आरती प्रतापवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. दीपाली पदमवार, सपना पेन्शनवार, पूजा खंडेलवार, दीपा बोनगुलवार, दीपा गुंडावार आदींसह अनेक महिला बैठकीला उपस्थित होत्या. अमृत स्वयंरोजगार या संकल्पनेअंतर्गत महिलांना घरगुती व लघुउद्योग उभारणी, तसेच व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक कौशल्यांची माहिती देण्यात आली. विशेषतः ऑनलाइन व्यवसाय, सोशल मीडिया, विविध ई-कॉमर्स माध्यमांच्या साह्याने उत्पादने व सेवा अधिक व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
दर्जेदार डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षणवर्ग लवकरात लवकर सुरू करावेत, अशी ठोस मागणी बैठकीत महिलांनी केली. या प्रशिक्षणातून स्थानिक उद्योजिकांना स्वतःचा ब्रँड तयार करणे, ऑनलाइन प्रचार-प्रसार वाढवणे आणि उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण करणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमामुळे उमरखेड परिसरातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, कौशल्यविकास आणि समाजातील सहभाग अधिक बळकट होण्यास हातभार लागणार आहे. आर्य वैश्य समाज आणि अमृत यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्याचे आणि अधिकाधिक महिलांना स्वयंरोजगाराच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याचे आवाहन या बैठकीतून करण्यात आले.
.....
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 01:00 PM News publication time | Views: 116 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 01:00 PM News publication time | Views: 116 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words