गडचिरोली येथे विश्व बंधुत्व दिवसानिमित्त स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणावर व्याख्यान*

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ’वसुधैव कुटुंबकम्’या भावनेचा प्रसार करण्याचा तसेच स्वामी विवेकानंदांच्या विचारांना युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

गडचिरोली येथे विश्व बंधुत्व दिवसानिमित्त स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणावर व्याख्यान* मुख्य फोटो
गडचिरोली येथे विश्व बंधुत्व दिवसानिमित्त स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणावर व्याख्यान* अतिरिक्त फोटो

*विश्व बंधुत्व दिवसानिमित्त स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणावर व्याख्यान* *गडचिरोली :* विश्व बंधुत्व दिवसाचे औचित्य साधून गडचिरोली येथील *श्री कॉम्प्युटर* येथे स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक *शिकागो भाषण १८९३* या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा, सर्वधर्मसमभावाचा आणि विश्वबंधुत्वाच्या संदेशाचा विद्यार्थ्यांपर्यंत प्रसार करणे हा होता. कार्यक्रमात श्री. गिरीश जी. हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वामी विवेकानंदांनी १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित सर्वधर्म परिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणातील विचारांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्वामी विवेकानंदांचा मानवतेचा संदेश, भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये, सर्व धर्मांप्रती आदर आणि बंधुभाव यांचे महत्त्व त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले. या कार्यक्रमाला एकूण ३० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांविषयी माहिती जाणून घेतली तसेच त्यांच्या प्रेरणादायी कार्यातून सामाजिक एकता, बंधुभाव आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा घेण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ’वसुधैव कुटुंबकम्’या भावनेचा प्रसार करण्याचा तसेच स्वामी विवेकानंदांच्या विचारांना युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Publisher: माधुरी रोटकर News publisher name | Date: 17-09-2026 News publication date | Time: 09:05 PM News publication time | Views: 150 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news
Publisher: माधुरी रोटकर News publisher name | Date: 17-09-2026 News publication date | Time: 09:05 PM News publication time | Views: 150 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement