आरमोरी तालुका (जि. गडचिरोली ) सरस्वती विद्यालय पळसगाव येथे जेन-जी’संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांचे विचार, युवकांची सामाजिक जबाबदारी तसेच अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती मिळाली. युवकांमध्ये सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणाची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आरमोरी तालुका (जि. गडचिरोली ) सरस्वती विद्यालय पळसगाव येथे जेन-जी’संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न मुख्य फोटो
आरमोरी तालुका (जि. गडचिरोली ) सरस्वती विद्यालय पळसगाव येथे जेन-जी’संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न अतिरिक्त फोटो

पडसगाव येथे ‘जेन-जी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न आरमोरी तालुक्यातील पडसगाव येथील उच्च माध्यमिक सरस्वती महाविद्यालयात अमृत संस्थेच्या वतीने ‘जेन-जी’संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला एकूण १३० विद्यार्थी उपस्थित होते, त्यामध्ये ७५ विद्यार्थिनींचा समावेश होता. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून चंद्रपूर विभागाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या उद्बोधनामध्ये त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्र, त्यांचे विचार आणि युवकांसमोर त्यांनी ठेवलेले आवाहन याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. स्वामी विवेकानंदांनी युवकांना दिलेला आत्मविश्वास, ध्येय निश्चिती, चारित्र्यनिर्माण आणि राष्ट्रसेवेचा संदेश विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला. युवकांनी आपल्या जीवनात सकारात्मक विचार, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठा अंगीकारून समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच देव, देश आणि धर्मासाठी आपल्या सामर्थ्यानुसार योगदान देण्याचे आवाहन युवकांना करण्यात आले. यावेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक विक्रम पांडे यांनी विद्यार्थ्यांना अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी योजनांबाबत उत्सुकता दाखवत विविध प्रश्नही विचारले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांचे विचार, युवकांची सामाजिक जबाबदारी तसेच अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती मिळाली. युवकांमध्ये सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणाची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वेदांत मेहता यांनी केले. महाविद्यालय प्रशासन, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Publisher: Vedant mehta News publisher name | Date: 17-09-2026 News publication date | Time: 08:37 PM News publication time | Views: 45 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news
Publisher: Vedant mehta News publisher name | Date: 17-09-2026 News publication date | Time: 08:37 PM News publication time | Views: 45 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement