भाजपा प्रदेश उपाध्यक्ष उद्योग आघाडी तसेच परशुराम हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर अमृत कार्यालयात गणपती बाप्पाची आरती

अमृतच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात गणपती बाप्पाची आरती उत्साहात पार पडली.राज्यव्यवस्थापक दीपक जोशी व विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष उद्योग आघाडी तसेच परशुराम हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर अमृत कार्यालयात गणपती बाप्पाची आरती मुख्य फोटो
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष उद्योग आघाडी तसेच परशुराम हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर अमृत कार्यालयात गणपती बाप्पाची आरती अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. गणरायाच्या या मंगलमय वातावरणात १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता भाजपा प्रदेश उपाध्यक्ष उद्योग आघाडी तसेच परशुराम हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे यांच्या शुभहस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी राज्यव्यवस्थापक दीपक जोशी आणि विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी श्री. विश्वजीत देशपांडे यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, ब्राह्मण महिला मंच अध्यक्षा विजया कुलकर्णी, अमृत मित्र रामेश्वर साळुंके, अमृत सखी रूचा शर्मा आणि विनया कुलकर्णी यांच्यासह अमृत कार्यालयातील टीम उपस्थित होती. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 17-09-2026 News publication date | Time: 07:42 PM News publication time | Views: 142 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 17-09-2026 News publication date | Time: 07:42 PM News publication time | Views: 142 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement