अमृत संस्थेच्या दिनदर्शिकांचे धुळे जिल्ह्यात वाटप

योजनांच्या माहितीसाठी दिनदर्शिका काढणाऱ्या अमृत संस्थेचे नागरिकांकडून आभार

अमृत संस्थेच्या दिनदर्शिकांचे धुळे जिल्ह्यात वाटप मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या दिनदर्शिकांचे धुळे जिल्ह्यात वाटप अतिरिक्त फोटो

धुळे : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या दिनदर्शिकेचे आज (एक जानेवारी २०२६) धुळे जिल्ह्यात वाटप करण्यात आले. आपल्या योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी अमृत संस्थेने दिनदर्शिका तयार केली आहे. योजनांची माहिती देण्यासाठी असा उपक्रम राबवणारी अमृत ही पहिली शासकीय संस्था आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आणि आभार मानले.

अमृत संस्थेच्या वतीने नववर्षानिमित्ताने समाजोपयोगी उपक्रम म्हणून दिनदर्शिका वाटप करण्यात आले. परिसरातील नागरिक, गरजू घटक व विद्यार्थ्यांना दिनदर्शिकांचे वितरण करण्यात आले. समाजप्रबोधन व सकारात्मक विचारांचा संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.

अमृत संस्थेचे धुळे जिल्हा व्यवस्थापक डॉ. हेमंत पाठक यांनी मान्यवर व्यक्ती व संस्थांना अमृत दिनदर्शिकेचे वाटप करून दिनदर्शिकेचे जिल्ह्यातील वितरण सुरू केले. अमृतसखी वैशाली कुलकर्णी व अमृतमित्र विलास चंद्रात्रे यांनीही जिल्ह्यात दिनदर्शिकेचे वाटप केले. अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून अमृत दिनदर्शिका तयार करण्यात आली असून, संपूर्ण राज्यात या दिनदर्शिकेचे वितरण सुरू झाले आहे. ही दिनदर्शिका १६ महिन्यांची म्हणजे एप्रिल २०२७पर्यंतची असून, अमृत संस्थेच्या सर्व योजनांची माहिती आणि संपर्क क्रमांक त्यात देण्यात आले आहेत.

.....
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: वैशाली कुलकर्णी News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 11:53 AM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news
Publisher: वैशाली कुलकर्णी News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 11:53 AM News publication time | Views: 73 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words