सोलापूरमध्ये ‘अमृत’च्या ५ दिवसीय EDP प्रशिक्षणातून समर्थ लांगोटे यांच्या परफ्यूम व्यवसायाला मिळाली नवी दिशा

सोलापूरमध्ये ‘अमृत’च्या ५ दिवसीय EDP प्रशिक्षणातून समर्थ लांगोटे यांच्या परफ्यूम व्यवसायाला नवी दिशा मिळाली. त्यांचा हा प्रेरणादायी अनुभव

सोलापूरमध्ये ‘अमृत’च्या ५ दिवसीय EDP प्रशिक्षणातून समर्थ लांगोटे यांच्या परफ्यूम व्यवसायाला मिळाली नवी दिशा मुख्य फोटो
मुख्य फोटो

सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने आयोजित ५ दिवसीय उद्यकता विकास प्रशिक्षणाला (EDP) सोलापुरात उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रशिक्षणाचे ५ दिवस यशस्वीपणे पूर्ण झाले असून, यामध्ये सोलापूरचे स्थानिक व्यावसायिक समर्थ लांगोटे यांनी सहभाग घेऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. समर्थ लांगोटे यांचा स्वतःचा परफ्यूम (सुगंधित उत्पादने) बनवण्याचा व्यवसाय आहे. आपला व्यवसाय अधिक कसा वाढवावा, ब्रँडिंग कसे करावे आणि डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी वापर कसा करावा, याविषयी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज होती. 'अमृत' संस्थेच्या प्रशिक्षण सत्रांमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना मार्केटिंग, ब्रँडिंग, तसेच इंस्टाग्रामवर रील तयार करून डिजिटल पद्धतीने व्यवसाय कसा वाढवायचा, याविषयी अत्यंत मोलाचे आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन मिळाले. ​प्रशिक्षणाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना समर्थ लांगोटे म्हणाले, "माझ्या परफ्यूमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मला ब्रँडिंग आणि मार्केटिंगची खूप गरज होती. अमृतच्या सोलापूर कार्यालयात ५ दिवसांच्या ईडीपी प्रशिक्षणादरम्यान मला अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली. सोशल मीडियाचा वापर करून व्यवसाय कसा वाढवावा हे समजले. हे प्रशिक्षण माझ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरले आहे." त्यांनी या उत्तम उपक्रमाबद्दल 'अमृत' संस्थेचे मनापासून आभार मानले. ​या प्रशिक्षणामुळे सोलापूर जिल्ह्यातील नवउद्योजक व व्यवसायिकांना आपल्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि सुरू असलेल्या व्यवसायाला नव्या उंचीवर नेण्यासाठी मोठी मदत होत असल्याचे दिसून येत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 17-09-2026 News publication date | Time: 11:26 AM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 17-09-2026 News publication date | Time: 11:26 AM News publication time | Views: 80 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement