अमरावतीमध्ये अमृत आणि एमसीईडी या संस्थांची समन्वय बैठक

स्थानिक गरजा लक्षात घेऊन संयुक्तपणे राबवले जाणार नावीन्यपूर्ण उपक्रम

अमरावतीमध्ये अमृत आणि एमसीईडी या संस्थांची समन्वय बैठक मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमरावती : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयात नववर्षाच्या पहिल्या दिवशी महत्त्वपूर्ण बैठक झाली. अमृत संस्थेचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे (एमसीईडी) अमरावती येथील प्रकल्प अधिकारी राजेश सुने यांच्या या बैठकीत एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या वेळी अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती घेण्यात आली. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योजकता प्रशिक्षण, व्यवसाय सल्ला आणि मार्गदर्शन या विषयांवर दोन्ही संस्थांमध्ये सकारात्मक विचारमंथन झाले.
या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर, जिल्हा उपव्यवस्थापक ऋषिकेश कथलकर, तसेच एमसीईडी संस्थेचे विस्तारक स्वप्नील ईसाळ आणि गजेश बहाड उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील स्थानिक गरजा लक्षात घेऊन संयुक्तपणे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली.
आजपर्यंत झालेल्या कामाचा आढावा या बैठकीतून घेण्यात आला.या भेटीमुळे दोन्ही संस्थांमधील सहकार्य अधिक दृढ होऊन अमरावती जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अधिक प्रभावी आणि व्यापक स्वरूपात लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

पत्ता : अमृत विभागीय कार्यालय,
आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडीसमोर,
टोपेनगर, अमरावती

केदार गोगरकर - 9112227635
अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 01:23 PM News publication time | Views: 346 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 01:23 PM News publication time | Views: 346 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words