ब्राह्मण बिझनेस नेटवर्क (BBN) टीमच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर अमृत कार्यालयात गणरायाची आरती करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क (BBN) टीमच्या हस्ते गणरायाची आरती उत्साहात पार पडली. यावेळी BBN अध्यक्ष अतुल रमेशराव कुलकर्णी, उपाध्यक्ष शैलेश लक्ष्मीकांत कुलकर्णी, सदस्य सागर बोरकर आणि सचिव राजेश्वर राव तिरुमला उपस्थित होते. अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे व ऋचा शर्मा यांनी टीमचे स्वागत करून अमृतच्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाची माहिती दिली.

ब्राह्मण बिझनेस नेटवर्क (BBN) टीमच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर अमृत कार्यालयात गणरायाची आरती करण्यात आली. मुख्य फोटो
ब्राह्मण बिझनेस नेटवर्क (BBN) टीमच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर अमृत कार्यालयात गणरायाची आरती करण्यात आली. अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. गणरायाच्या या मंगलमय वातावरणात १६ सप्टेंबर रोजी ब्राह्मण बिझनेस नेटवर्क (BBN) टीमच्या हस्ते सायंकाळची गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.

यावेळी ब्राह्मण बिझनेस नेटवर्क, छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष अतुल रमेशराव कुलकर्णी, उपाध्यक्ष शैलेश लक्ष्मीकांत कुलकर्णी, सदस्य सागर बोरुळकर तसेच सचिव राजेश्वरराव पेरुमला यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृत सखी रुचा शर्मा यांनी अमृत कार्यालयाच्या वतीने BBN टीमचे स्वागत केले. यावेळी अमृतच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाची सविस्तर माहिती BBN टीमला देण्यात आली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 16-09-2026 News publication date | Time: 07:04 PM News publication time | Views: 133 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 16-09-2026 News publication date | Time: 07:04 PM News publication time | Views: 133 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement