प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त समाज बंधावानी लाभ घेऊन उद्योग व्यवसाय उभे करावे असे आवाहन यावेळी अमृत संस्थे तर्फे करण्यात आले.
सांगली, दि. १५ सप्टेंबर:
आज सांगली टिंबर मर्चंट असोसिएशनची सर्वसाधारण सभा पाटीदार भवन येथे श्री धनाजीभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेत संस्थेच्या मागील वर्षातील विविध उपक्रमांचा व कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पटेल, पाटीदर व गुजराथी समाजासाठी असलेल्या अमृत (AMRUT) संस्थेच्या विविध योजनाची माहिती समाजापर्यंत पोहचावी यासाठी या संस्थेतर्फे श्री शैलेन्द्र जहागिरदार यांना माहिती देण्यासाठी बोलावण्यात आले होते.
अमृत अंतर्गत असलेल्या विविध कल्याणकारी व विकासात्मक योजनांची तसेच समाजोपयोगी उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. महिलांसाठी असलेल्या व नवोद्योजक घडवण्याच्या प्रयत्नांचा भाग असलेला प्रशिक्षण कार्यक्रमांबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त समाज बंधावानी लाभ घेऊन उद्योग व्यवसाय उभे करावे असे आवाहन यावेळी अमृत संस्थे तर्फे करण्यात आले.
या सभेला असोसिएशनचे पदाधिकारी, आणि समजबांधव मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.
*अमृत संस्थेविषयी :-* अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील अश्या जाती ज्यांना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ नाही अश्या जातीतील आर्थिक दुर्बल घटक हा अमृतचा लक्षित गट आहे. लक्षित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, येलमार, हिंदू नेपाळी, भूमिहार, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी, हिंदू वीरशैव लिंगायत इ. जातींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी
संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
https://mahaamrut.org.in/
*अधिक माहिती साठी संपर्क : ९११२२२८७६६ /७०५७६०७४१९ /७९७२८३०७५७ महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अमृत जिल्हा कार्यालय, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर, राजवाडा, सांगली ४१६४१६
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment