छत्रपती संभाजीनगर येथील अमृत विभागीय व जिल्हा कार्यालयातील श्री गणरायाची देवगिरी नागरी सहकारी बँकेचे मार्केटिंग हेड दीपक बावस्कर, शाखाधिकारी प्रशांत जोशी आणि संदीप भाले यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी अमृतअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली
छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) विभागीय व जिल्हा कार्यालयात विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पाची आज दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता आरती करण्यात आली.
यावेळी देवगिरी नागरी सहकारी बँकेचे मार्केटिंग हेड श्री. दीपक बावस्कर, देवगिरी नागरी सहकारी बँक शिवाजीनगर शाखेचे शाखाधिकारी श्री. प्रशांत जोशी आणि श्री. संदीप भाले यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि अमृत सखी रूचा शर्मा उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांचे अमृतच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी अमृत स्वायत्त संस्थेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. अमृतच्या माध्यमातून युवक, महिला आणि लक्षित गटासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही यावेळी सांगण्यात आली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment